काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडावं लागलं आहे. दरम्यान, काश्मीरबद्दल अमेरिकेच्या एका वक्तव्यावरून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेनं केलेल्या एका ट्वीटमधघ्ये जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचा उल्लेख न केल्याचं सांगत पाकिस्ताननं त्यावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेनं गुरूवारी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरबद्दल आपल्या धोरणांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं होतं. "आम्ही जम्मू काश्मीरमध्ये ४ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. हे स्थानिकांसाठी उचलण्यात आलेलं एक उत्तम पाऊल आहे. या क्षेत्रातील परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी राजकीय आणि आर्थिक प्रगती कायम राहिल अशी आम्ही आशा करतो," असं ट्वीट अमेरिकेनं केलं होतं.
काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:53 PM
Pakistan on Jammu Kashmir : अमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेप
ठळक मुद्देअमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेपपाकिस्तानच्या आक्षेपानंतरही अमेरिकेकडून कोणतेही बदल नाहीत