पाकिस्तानमध्ये (Pakistan) दुआ जेहराचं (Dua Zahra) प्रकरण सतत चर्चेत आहे. यावर्षी 16 एप्रिल रोजी दुआ जेहरा कराचीहून बेपत्ता झाली होती. दुआच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा आरोप लावला होता. एप्रिलमध्ये बेपत्ता झालेल्या दुआला पोलिसांनी जून महिन्यात शोधलं होतं. आता दुआ जेहरा पहिल्यांदा सार्वजनिकपणे लोकांसमोर आली आहे. दुआची एक मुलाखत समोर आली आहे.
या मुलाखतीत दुआने सांगितलं की, तिचं अपहरण झालं नव्हतं. तर ती निकाह करण्यासाठी तिच्या मर्जीने घर सोडून गेली होती. दुआ म्हणाली की, ती 21 वर्षीय जहीर अहमदवर प्रेम करते. जहीरसोबत लग्न करण्यासाठी ती घर सोडून गेली होती.
दुआ जेहराने मुलाखतीत सांगितलं की, तिने इस्लामिक कायद्यानुसार लग्न केलं. जर त्यांना वाटत असेल की, निकाह करून मी चूक केली तर मला वाईट वाटेल. ती म्हणाली की, माझी इच्छा आहे की, त्या लोकांनी मला आणि जहीरला मोठ्या मनाने स्वीकारावं. मला माहीत आहे की, त्यांना फार वाईट वाटलं. मलाही दु:खं होत आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की, त्यांनी आम्हाला स्वीकारावं. दुआने हेही सांगितलं की, तिच्या वडिलांनी जमिनीच्या लालसेपोटी आपल्या भावाच्या मुलासोबत कराचीत माझं लग्न ठरवलं होतं.
वयावरूनही वाद
दुआ जेहराच्या वयावरूनही अनेक अंदाज लावले जात आहेत. दुआचे वडील सुरूवातीपासून हे सांगत आहेत की, त्यांची मुलगी अल्पवयीन आहे आणि तिचं वय केवळ 14 वर्षे आहे. तेच दुआने समोर येऊन सांगितलं की, तिचं वय 18 वर्ष आहे. आता ही मुलाखत समोर आल्यावर दुआचे वडील मेहदी काजमीने कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ते ही मुलाखत घेणाऱ्या महिलेविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.
या मुलाखतीतून दुआ जेहरा आणि तिचा पती जहीरने पहिल्यांदा समोर येऊन आपली बाजू मांडली. यावर बोलताना काजमी म्हणाले की, याप्रकरणी सुरूवातीपासून जे बोललं जात आहे ते चुकीचं आहे. ते म्हणाले की, त्यांची मुलगी या लोकांच्या ताब्यात आहे. ते हवं ते माझ्या मुलीकडून बोलवून घेत आहेत.
काजमी म्हणाले की, मुलाखत घेणाऱ्या महिलेला ते कोर्टात खेचतील. मुलाखत घेणाऱ्या महिलेने सांगितलं की, ती पहिल्या दिवसापासून दुआ जेहरा आणि जहीरच्या संपर्कात होती. पण आता जेव्हा या महिलेला नोटीस मिळेल ती गायब होईल.
सिंध हायकोर्टाने दुआ जेहरा प्रकरणी लिखित आदेशात म्हटलं होतं की, असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, ज्यावरून हे समजेल की, तरूणीचं अपहरण करण्यात आलं होतं. जेहराने कोर्टासमोर सांगितलं होतं की, मी माझ्या मर्जीने निकाह केला आहे. कुणीही माझं अपहरण केलं नाही. मला पती जहीरसोबत रहायचं आहे. मला माझ्या आई-वडिलांचा चेहराही बघायचा नाहीये.