Pakistan Economic Crisis: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, मीठ या सारख्या वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आयएमएफकडून कर्जासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण अजुनही कर्ज मिळालेले नाही. अनेक देशांना मदतीसाठी पाकिस्तानने हाक दिली आहे. पाकिस्तान कधीही दिवाळखोरीत निघू शकतो.
चीननेही आता पाकिस्तानला आयएमएफच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानातील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. दुसरीकडे आयएमएफकडून निधी मिळाला तरी तो किती मिळणार यावर सर्व अवलंबून आहे. उत्पन्न कमी होत आहे. अशा परिस्थितीत IMF कडून १ अब्ज डॉलर्सची मदत मिळाली तरी हा धोका काही दिवसांसाठीच टळणार आहे. म्हणजे पाकिस्तान आता कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे, आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. कारण जुने कर्ज फेडण्यासाठी सातत्याने नवीन कर्जे घेतली जात आहेत.
घटत्या लोकसंख्येमुळे चीनचा अजब निर्णय; लग्न न झालेल्या जोडप्यांना दिली मोठी ऑफर
एक वर्षापूर्वी श्रीलंकेतही अशीच परिस्थिती झाली होती. श्रीलंकेत एकाच घराणेशाहीच्या चुकीच्या धोरणांमुळे गरिबी आली आहे. तिजोरीवर बोजा वाढत असतानाही सत्तेत राहण्यासाठी लोकाभिमुख निर्णय घेतले गेले. हे सर्व कर्ज घेऊन केले जात होते, याचा अर्थ ते दिवाळखोरीत निघाले होते. पाकिस्तानच्या कर्जाने मोठे रूप धारण केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांचे जुने मित्रपक्ष त्यांना एक पैसाही द्यायला तयार नाहीत. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे, राजकीय अस्थिरतेमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीही वाढली आहे. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा जवळपास रिकामा आहे.