ॲपलनं या महिन्यात भारतातील मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये आपली स्टोअर्स सुरू केली. ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी स्वत: भारतात येऊन या स्टोअर्सचं उद्घाटन केलं. उद्घाटनावेळी दोन्ही स्टोअर्सवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायरल झाले होते. तसंच टिम कुक लोकांसोबत फोटोही काढताना दिसले होते. भारतातील ॲपल स्टोअर्सबाबत पाकिस्तानातूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानी लोकांचं म्हणणं आहे की, भारतातील लोक ॲपल स्टोअर्सबाहेर रांगेत उभे आहेत, तर पाकिस्तानातील लोकांना मोफत रेशनसाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागत आहे.पाकिस्तानात पुन्हा सत्तापालट होणार? माजी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही संविधान ट्विस्ट केलं…”
भारतात गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं म्हणत पाकिस्तानी युझर्सनं भारताचं कौतुकही केलं. पाकिस्तानला भारताशी तुलना करण्याचा अधिकार राहिलेला नाही. आम्ही भारताच्या तुलनेत कुठेही उभं राहू शकत नाही. पाकिस्तानच्या नेत्यांनी केवळ भारताविरोधात संरक्षण बजेटच्या नावाखाली संपत्ती जमा केल्याचा आरोप एका युझरनं केलाय. “भारतीय लोक मुंबईत ॲपलचे पहिलं स्टोअर सुरू झाल्याचा आनंद साजरा करत आहेत आणि पाकिस्तान आपल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची किंवा देशाच्या चलनाची, अगदी संस्थांचीही काळजी घेऊ शकत नाही,” असं म्हणत एका युझरनं टीकेचा बाण सोडला.
पाकिस्तानात विदेशी असुरक्षितपाकिस्तानात चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या वर्षी कराची युनिव्हर्सिटीत झालेल्या हल्ल्यात तीन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. स्वीडननंही याच महिन्यात इस्लामाबादमधील आपलं दुतावास सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलं. दुतावास अनिश्चित काळासाठी बंद केलं जात असून कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं होतं.