गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानात पीठ, डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशात परकीय चलनसाठा संपत आला आहे. सध्या पाकिस्तानला जागतिक बँकेकडून आयएमएफकडून कर्जाची अपेक्षा आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती महागल्या आहेत, तर दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढी आर्थिक नासाडी होऊनही देशात आलिशान गाड्यांची मागणी वाढली आहे. यादरम्यान देशात कारची आयातही झपाट्याने वाढली आहे.
आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!
एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या 6 महिन्यांत 2200 लक्झरी कार आणि महागड्या इलेक्ट्रिक वाहनांची आयात करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 1.2 अरब अमेरिकी डॉलक अब्ज खर्च झाले आहेत. देशातील आर्थिक संकट अधिक गडद झाल्यानंतरही महागड्या वाहनांची आयात केली जात आहे, एकीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणात गरिबी आल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे आलिशान गाड्या मोठ्या प्रमाणात मागवल्या जात आहेत.
देशात परकीय चलनाची कमतरता आहे आणि अहवालांनुसार, देशात फक्त 5 बिलियन डॉलर पेक्षा कमी परकीय चलन आहे, हे चलन फक्त तीन आठवडेच राहणार आहे. या बिकट अवस्थेतही पाकिस्तान सरकारने वाहनांच्या आयातीवर 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 9770 कोटी रुपये खर्च केले आहेत.
परकीय चलनाच्या कमतरतेमुळे विविध वस्तू आणि उत्पादनांचे कंटेनरांचे ढीग लागले आहेत. पाकिस्तानच्या विविध बंदरांवर 8,500 पर्यंत कंटेनर येऊन थांबले आहेत, या कंटेनरनरचे पैसे देण्यासाठी नाहीत. पाकिस्तानने आयातीवर सुमारे शंभर अब्जांचा मोठा खर्च केला आहे आणि हे काम फक्त 2 अब्ज रुपयांचे शुल्क आणि इतर कर टाळण्यासाठी केले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जुलै-डिसेंबर 2022 या कालावधीत 1,990 युनिट्स आयात करून तीन वर्षे जुन्या लक्झरी वाहनांच्या आयातीत सर्वात लक्षणीय वाढ झाली आहे.