Pakistan Economic Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. तेल, पीठ, डाळ तसेच इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे कर्जाची मागणी केली, पण अजुनही कर्ज मिळालेले नाही. यासह सौदीकडेही विनाव्याज कर्जाची मागणी केली, पण आता सौदीनेही नकार दिला आहे, त्यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
पाकिस्तानने आयएमएफकडे मागणी करूनही अद्याप बेलआउट पॅकेज मिळालेले नाही. इस्लामिक देशांवर पाकिस्तानने विश्वास ठेवला होता पण आता या देशांनीही हात वर केले आहेत. त्यांनीही बिना व्याज कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सौदी अरेबियाने पूर्वीप्रमाणे यापुढे बिनव्याजी कर्ज देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. सौदी अरेबियाला आधी पाकिस्तानसाठी आयएमएफचे बेलआउट पॅकेज मंजूर करायचे आहे, त्यानंतरच कर्ज दिले पाहिजे. सध्या कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्वास नाही.
अमृतपालसिंग अद्याप पंजाबमध्येच! मुलीकडचे येण्यापूर्वी एका घरात घुसला, जेवण संपविले अन् गेला
मित्र देशांनीही अजून मदत न केल्याचे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही मित्र देशाकडे कर्जाची मागणी केली पण अजुनही कोणीच होकार दिलेला नाही. सौदी अरेबियाने याआधीही पाकिस्तानला खूप मदत केली आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानला कर्जावर मोठ्या प्रमाणात तेल पुरवत आहे. नुकतेच IMF ने श्रीलंकेला एक मोठे मदत पॅकेज दिले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने आयएमएफच्या काही अटी मान्य करून आपल्या जनतेवर कराचा मोठा बोजा टाकला. तरीही आयएमएफने कर्ज दिलेले नाही.
या अगोदर सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत करत होता. अणुऊर्जेच्या बदल्यात प्रतिदिन ५० हजार बॅरल तेल मोफत दिले असल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानातील धार्मिक संघटनांनाही सौदी अरेबियाकडून निधी मिळणार होता.
पाकिस्तानातील राजकीय पेचप्रसंगामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता हे देखील विश्वास गमावण्याचे एक कारण आहे. सरकारमध्ये लष्कराचा हस्तक्षेप जास्त आहे. अलीकडेच इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तानला ज्या पद्धतीने दाखवले जात आहे आणि सध्याचे सरकार बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा स्थितीत पाकिस्तानवर कोणाचाही विश्वास बसू शकत नाही. (Pakistan Economic Crisis)