Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या गंगाजळीवर अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. पुढील अनेक वर्ष पाकिस्तान यातून बाहेर पडू शकत नसल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. पाकिस्तानला दरवर्षी २५ अब्ज डॉलर्स परत करावे लागणार आहेत. यामुळे अनेक वर्ष पाकिस्तान यात अडकून राहिलस असं इस्माईल म्हणाले. इस्माईल हे शहबाज शरीफ सरकारमध्ये एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत पाकिस्तानचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. दहशतवादामुळे कोणताही परदेशी पाकिस्तानात येऊ इच्छित नाही किंवा गुंतवणूक करू इच्छित नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
“जर पाकिस्ताननं हे संपवलं नाही तर हे संकट दीर्घकाळ चालेल. पाकिस्तान यातून बाहेर पडू शकणार नाही. सद्यस्थितीत तुम्ही टॅक्स दुप्पट किंवा तिप्पट जरी केला तरी यातून बाहेर निघणं शक्य नाही. पाकिस्तानचा परकीय चलनसाठा तळाला पोहोचला आहे. महागाईनंदेखील उच्चांक गाठलाय. पाकिस्तानवर डिफॉल्ट होण्याची भीती आहे,” असं इस्माईल एका भाषणादरम्यान म्हणाले.
दरवर्षी २५ अब्ज डॉलर्सची परतफेड“पाकिस्तान आता कर्ज फेडणं भाग आहे. पाकिस्तान या संकटातून बाहेर येण्यासाठी आयएमएफकडे मदत मागत आहे. परंतु कर्ज मिळत नाही. पाकिस्तान एका किचकट परिस्थितीत अडकलाय. यातून आणखी संकट निर्माण होतंय आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. पाकिस्तानला दरवर्षी डिफॉल्ट करण्यापासून वाचण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानचा महागाई दर ४० टक्क्यांच्या वर गेलाय आणि आयएमएफनुसार यावर्षी विकासदर ०.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हे संकट कायम राहणार आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मोठे बदल करावे लागतील. पाकिस्तानची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अर्थव्यवस्था बांगलादेशपेक्षाही खराब झालीये. पाकिस्तानसाठी दहशतवाद संकट बनलाय आणि कोणतीही विदेशी येथे येऊ इच्छित नसल्याचे इस्माईल म्हणाले.