शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

बाप रे बाप! २७० रु. दूध, ८०० रु. चिकन, तर २५०० रु चहापत्ती...पाकिस्तानात महागाईचा 'बॉम्ब'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:31 AM

सखी सइयां तो खूबई कमात हैं, महंगाई डायन खाये जात है…बॉलीवूडच्या 'पीपली लाइव्ह' या चित्रपटातील हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.

सखी सइयां तो खूबई कमात हैं, महंगाई डायन खाये जात है…बॉलीवूडच्या 'पीपली लाइव्ह' या चित्रपटातील हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. सध्याच्या महागाईच्या फेऱ्यात हे गाण पाकिस्तानसाठी अगदी चपखल बसतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कर्जात बुडालेल्या पाकिस्तानात महागाईचा बॉम्ब फुटला आहे. महागाईचा कहर इतका वाढला आहे की पाकिस्तानात सर्वसामान्यांच्या किचनमधून पीठ गायब झालं आहे. बिस्किटं, दूध, चिकन खरेदी करणंही आवाक्याबाहेर गेलं आहे. 

पाकिस्तानात दररोज महागाई नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. पाकिस्तानच्या बंदरांवर माल पोहोचला आहे पण तो वितरीत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. येथे दुधाचा दर प्रतिलिटर २१० रुपयांवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी यापेक्षा जादा दराने दूध मिळत आहे. तर चहापत्ती २५०० रुपये किलोने विकली जात आहे.

गंभीर आर्थिक संकटात असताना पाकिस्तान IMF कडे झोळी पसरत आहे. जेणेकरून महागाईवर नियंत्रण ठेवता येईल, पण IMF च्या अटी इतक्या कडक झाल्या आहेत की आता पाकिस्तानला कर्ज मिळणं देखील कठीण झालं आहे. दूध, चिकनसह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १९० रुपयांवरून २१० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत बॉयलर चिकनच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची किंमत ४८० ते ५०० रुपये प्रतिकिलो झाली आहे.

पाकिस्तानात महागाईचे सर्व विक्रम मोडीतचिकन आता ७००-७८० रुपये प्रतिकिलो विकले जात आहे जे पूर्वी ६२०-६५०  रुपये प्रतिकिलो होते. अहवालात म्हटले आहे की, बोनलेस चिकनची किंमत आता १००० ते ११०० रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, महागाईचा दुधाच्या दरावर विशेष परिणाम होतो. कराची मिल्क रिटेलर्स असोसिएसनच्या माहितीनुसार १००० हून अधिक दुकानदार चढ्या दरानं दूध विकत आहेत. ही प्रत्यक्षात घाऊक विक्रेते/दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची दुकाने आहेत.

७०० रुपये किलोने विकलं जातंय चिकनदुग्ध उत्पादक शेतकरी आणि घाऊक विक्रेत्यांनी दुधाचे वाढलेले दर कमी केले नाहीत तर २१० रुपयांऐवजी २२० पाकिस्तानी रुपये प्रतिलिटर होतील. याच अहवालात सिंध पोल्ट्री होलसेलर्स असोसिएशनचे सरचिटणीस कमाल अख्तर सिद्दीकी यांनी सांगितले की, कोंबडीचा दर ६०० रुपये प्रतिकिलो, तर मांसाचा दर ६५० ते ७०० रुपये आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान