इस्लामाबाद - पाकिस्तानात पंतप्रधान निवडीसाठी व एक नागरी सरकार दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे सोपवण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू असताना भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. क्वेटा येथे मतदानादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटामधील पूर्वकेडील बायपासजवळ हा स्फोट घडवण्यात आला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. ज्या परिसरात पोलीस गस्तीवर तेथे एका पोलीस व्हॅनजवळ हा स्फोट घडवण्यात आला. दरम्यान, मृतांमध्ये तीन पोलीस आणि दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
(पाकिस्तान निवडणूक, दहशतवादी हाफिज सईदने केलं मतदान)