शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
4
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
5
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
6
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
7
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
8
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
9
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
10
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
11
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
12
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
13
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
14
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
15
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
16
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
17
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
18
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
19
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचे दिले आदेश, राजकीय पक्षांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 2:00 PM

Pakistan Election : पीटीआयने देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हेराफेरीचा आरोप केला आहे. 

पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांमुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)  पक्षाचे समर्थन असलेले नेते आज देशभरात निदर्शने करत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. पीटीआयने देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हेराफेरीचा आरोप केला आहे. 

दरम्यान, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा हा आदेश केवळ त्या जागांसाठी आहे, ज्या ठिकाणी मोठी हेराफेरी, मतपत्रिका हिसकावणे, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर इतर जागांवर फेरनिवडणूक होणार नाही.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला अनेक भागात मतदान केंद्रांवरून मतदान साहित्य हिसकावून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने हे निर्देश जारी केले आहेत. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, मतदान साहित्य हिसकावून नुकसान झाल्याच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व विविध मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश जारी केले आहेत. 

निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीतपाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मतदान संपल्यानंतर चौथ्या दिवशीही निवडणुकीचे नेमके निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या पीटीआयला 100 जागा, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनला 73 जागा आणि बिलावलच्या पक्षाला 52 जागा मिळताना दिसत आहेत. पण, काही जागा अशा आहेत की, जेथे हेराफेरीच्या आरोपांमुळे चौथ्या दिवशीही निकाल जाहीर होऊ शकला नाही. या जागांवरच पुन्हा मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी 15 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.

पीटीआयवर निवडणुकीपूर्वी बंदी  घोटाळ्याच्या आरोपांनी घेरलेले इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांचा पक्ष पीटीआयवरही निवडणुकीपूर्वी बंदी घालण्यात आली. मात्र, इम्रान खान यांच्या समर्थक नेत्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पीटीआय समर्थित 100 अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला 73 जागांवर विजय मिळाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकElectionनिवडणूकImran Khanइम्रान खान