कोटा : पाकिस्तानमधील दरेंगड भागात असलेल्या मस्तंगमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या बॉम्बस्फोटात अनेक नेत्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील दरेंगड भागातील मस्तंगमध्ये बलुचिस्तान अवामी पार्टीचे उमेदवार नवाबजादा सिराज रायसन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान हा बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात नवाबजादा सिराज रायसन यांच्यासह 70 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. तसेच, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, नवाबजादा सिराज रायसन यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याच्या बातमीला त्यांचे भाऊ लष्करी रायसन यांनी दुजोरा दिला आहे. तसेच, त्यांनी यासंबंधी धमकी मिळाल्याचेही सांगितले.