इस्लामाबाद - निवडणूक प्रचारादररम्यान भारताविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. उपखंडामध्ये समृद्धीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती होणे आवश्यक असल्याचे सांगत भारतासोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर संवाद साधताना इम्रान खान म्हणाले. जर आम्हाला या क्षेत्रातून गरिबी दूर करायची असेल, तर आम्हाला भारत आणि पाकिस्तामधील व्यापार वाढवला पाहिजे." यावेळी कायदे आझम मोहम्मद अली जिन्ना यांच्या स्वप्नातील पाकिस्तान आपल्याला बनवायचा आहे, असेही इम्रान यांनी सांगितले.
Pakistan Election Results: भारतासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देणार, विजयानंतर इम्रान खानची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 6:57 PM