शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

Pakistan Election Results: इम्रान खान : पाकिस्तानचा कप्तान ते वझीर-ए-आझम!  

By बाळकृष्ण परब | Published: July 26, 2018 1:03 PM

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानमधील निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने बाजी मारली इम्रान अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अखेर वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजाप्रमाणे इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली आहे. नवाझ शरीफ यांचा पीएमएल (एन), बिलावल भुत्तोंचा पीपीपी आणि इम्रानचा पीटीआय या पक्षांमध्ये झालेल्या त्रिकोणी लढाईत इम्रानचा पक्ष वरचढ ठरलाय. त्यामुळे इम्रान खानचे पाकिस्तानचा वझीर-ए-आझम बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.इम्रानचा जागतिक दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ते पाकिस्तानमधील प्रभावशाली राजकारणी बनण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीसारखाच धडाकेबाज राहिला आहे.  क्रिकेट खेळत असताना इम्रान हा त्याच्या सहकाऱ्यांमध्ये टीम लिडर म्हणून लोकप्रिय होता. त्याची खेळाडूंची पारख करण्याचे, आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे किस्से आजही क्रिकेटमध्ये रंगवून सांगितले जातात. राजकारणात उतरल्यावर हेच गुण त्याला उपयुक्त ठरले आणि तो अल्पावधीतच टीम लिडरपासून नॅशनल लिडर बनला.

इम्रानचे व्यक्तिमत्त्व काहीसे रंगेल. अनेक महिलांशी असलेल्या त्याच्या संबंधाची अनेकदा चर्चा झाली. त्याचे वैवाहिक जीवनही तितकेच वादळी राहिले. मात्र पाकिस्तानी जनतेने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्याच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनालाच अधिक महत्त्व दिले. कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ कॅन्सर रुग्णालय उभारून त्याने जनसेवेचा आदर्श निर्माण केला होता. पुढच्या काळाता पाकिस्तानी राजकारण भ्रष्टाचार आणि परिवारवादामध्ये गुंतल्यानंतर इम्रान हाच पाकिस्तानी जनतेसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे आला.1992 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर 1996 मध्ये त्याने पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र 2013 साली खैबर पख्तुनख्वा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.आता इम्रान खानसारखा एकेकाळचा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची सकारात्मक संबंधांची अपेक्षा ठेवता येणार नाही. इम्रान एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारताविरोधात जेवढ्या त्वेषाने खेळला तीच आक्रमकता तो पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दाखवण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे पाठबळ त्याच्या मागे असल्याने पाकिस्तानचे पंचप्राण असलेल्या या संस्थांना तो दुखावणार नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली होती. पाकिस्तानकडून गेल्या 70 वर्षांत भारताला जे काही मिळाले, तेच यापुढेही मिळेल, असे मत तो सातत्याने मांडत होता. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तो याची अंमलबजावणी करू शकतो. त्यातून सीमेवरील तणाव वाढणे, काश्मीरमधील अशांतता वाढणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे भारताला सध्यातरी इम्रानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकCricketक्रिकेटImran Khanइम्रान खान