Imran Khan Arrest, Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सात-आठ दिवसांपूर्वी अतिशय नाट्यमय पद्धतीने त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. त्यानंतर इम्रान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने सांगितले व त्यांना जामीन मंजूर केला. असे असतानाही, इम्रान यांना कीडनॅप करून हायकोर्टात कोंडून ठेवण्यात आल्याचे दावा त्यांनी केला होता. इम्रान यांचे निकटवर्तीय, माजी मंत्री फवाद चौधरी यांनाही कोर्टाने अटकेपासून सुरक्षा दिल्यानंतर, एटीएस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पाकिस्तानात तुफान राडा सुरू असतानाच आता इम्रान यांच्या ट्विटर वरील नव्या ट्विटने खळबळ माजली असून पाकिस्तानात आता काय होणार आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे इम्रान यांचे ट्विट?
इम्रान खान यांनी बुधवारी दावा केला की पोलिसांनी त्यांच्या घराला वेढा घातला असून त्यांना पुन्हा अटक केली जाऊ शकते. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुढील अटकेपूर्वी कदाचित माझे शेवटचे ट्विट. पोलिसांनी माझ्या घराला वेढा घातला आहे." इम्रान खानने "लंडन प्लॅन" बद्दल बोलल्यानंतर आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली सरकार त्याला 10 वर्षांची तुरुंगात टाकण्याची योजना आखत असल्याच्या दोन दिवसानंतर हे घडले. त्यांची पत्नी बुशरा बेगम यांनाही तुरुंगात पाठवण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणाले होते की, जेव्हा ते तुरुंगात होते, तेव्हा अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या निमित्ताने न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लादाची भूमिका बजावली होती. "आता बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा अपमान करण्यासाठी काही देशद्रोहाचा कायदा वापरायचा आणि पुढची दहा वर्षे मला आत ठेवण्याची योजना आखली जात आहे."
माजी पंतप्रधानांनी पुढे असा दावा केला की त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर अधिकारी पीटीआय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांकडे जे काही उरले आहे, त्यावर संपूर्ण कारवाई करतील. आणि शेवटी ते पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि एकमेव संघीय पक्षावर बंदी घालतील. ज्या प्रकारे त्यांनी पूर्व पाकिस्तानात अवामी लीगवर बंदी घातली तसाचा त्यांचा प्लॅन असल्याचेही इम्रान यांनी म्हटले आहे.