Pakistan Flood: भारताचा शेजारील देश पाकिस्तान महापुराशी झुंज देत आहे. संपूर्णपाकिस्तानातील परिस्थिती बिकट बनली आहे. दरम्यान, एक सॅटेलाइट इमेज समोर आली आहे, ज्यामध्ये सिंधू नदीच्या पुरामुळे 100 किमी रुंद तलाव तयार झाल्याचे दिसत आहे. सॅटेलाइट फोटोंमधून पाकिस्तानातील हे भयावह दृष्य समोर आले आहे.
हजारो लोकांचा मृत्यूमहापुरामुळे पाकिस्तानातील शेतीचा मोठा भाग पाण्यात गेलाय. मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 1,162 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, या पुरामुळे 3,554 लोक जखमी झाले आहेत आणि जूनच्या मध्यापर्यंत सुमारे 33 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत.
मोठा तलाव तयार झालाNASA च्या MODIS उपग्रहाने 28 ऑगस्ट रोजी एक फोटो घेतला, ज्यामध्ये सिंधू नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिणेचा बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. या फोटोच्या मध्यभागी एक गडद निळा रंग दिसतोय, हा तोच 100 किमी रुंदीचा सरोवर आहे., जे सिंधूला आलेल्या पुरामुळे नैसर्गिकरित्या तयार झाले होते. हे सर्व क्षेत्र कृषी क्षेत्राखाली येते.