मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पीठ, तांदुळसाठी लोकांना झगडावे लागत आहे. यादरम्यान, रावळपींडीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रावळपींडी येथे एक अख्खी पोल्ट्री फॉर्म लुटल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी येथे पोल्ट्री फार्म मधून तब्बल ३० लाख रुपयांच्या कोंबड्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील परकीय चलनाचा साठा संपत आला आहे आणि देशाकडे फक्त काही दिवसांचे आयात पैसे शिल्लक आहेत.
रावळपिंडीत 12 सशस्त्र लोकांनी पोल्ट्री फार्म लुटला. येथे 5000 कोंबड्या लुटून कामगारांना ओलीस ठेवण्यात आले. या कोंबड्यांची किंमत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतमालक वकास अहमद यांनी एफआयआर दाखल केला आहे, या एफआयआरमध्ये 10 ते 12 अज्ञात लोकांविरोधात तक्रार केली आहे. 'काही लोकांकडे शस्त्रे होती आणि त्यांनी गुरुवारी पोल्ट्री फार्मवर हल्ला केला, असं वकास अहमद म्हणाला.
या आरोपींवी तीघांना ओलीस ठेवून लूटमार केली. दरोडेखोर तीन मिनी ट्रकमधून आले होते आणि त्यांच्यासोबत दोन मोटारसायकलही होत्या. एफआयआरनुसार, कामगारांना वॉशरूममध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोरांनी कोंबड्या ट्रकमध्ये नेऊन पळ काढला. या कोंबड्यांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी कामगारांची सुटका केली.
खऱ्या प्रेमाच्या शोधात ७ दिवसांत ६ वेळा डेटिंगला गेली, मग पुढील २ वर्ष जे घडलं..
पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पॅकेज मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. देशात महागाई वाढत आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकार कठोर परिश्रम करत असल्याचे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे.