जम्मू काश्मीरवरून सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आपल्याच एका वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुरैशी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यानंतर विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरूवात केली. परंतु आता कुरैशी यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. "मी स्पष्ट करू इच्छितो की जम्मू काश्मीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यात आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्दा मानला गेला आहे. यावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमत चाचणी घेतली जाईल. जम्मू काश्मीरशी निगडीत कोणताही मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असूच शकत नाही," असं म्हणत कुरैशी यांनी टीकेनंतर सारवासारव केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.
Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती; विरोधानंतर आता युटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:15 PM
Pakistan On Article 370 : कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशी. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न
ठळक मुद्देकलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशीविरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न