इस्लामाबाद : पाकिस्तानरशियाशी दीर्घकालीन भागीदारी करण्याच्या विचारात आहे, असे पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांचे रशियन समपदस्थ सेरगे लावरोव्ह यांना सांगितले. यावेळी दोन्ही देशांनी कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती व अफगाण शांतता प्रक्रियेवरही चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली तेव्हा कुरेशी यांनी रशियात कोरोनामुळे झालेल्या मनुष्यहानीबाबत दु:ख व्यक्त केले. कोरोनाची झळ बसलेल्या देशांत रशिया सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ५,६१,०९१ रुग्ण आहेत. ७,६६० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी दोन्ही देशांनी समान हिताचे मुद्दे, कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती, विविध क्षेत्रांतील सहकार्य याबाबत चर्चा केली. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीनंतर उभे राहणाºया सामाजिक-आर्थिक स्थितीबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. कुरेशी यावेळी म्हणाले की, पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून रशिया हा महत्त्वाचा भागीदार आहे.व दीर्घकालीन व विविध मुद्यांवर सहकार्य करीत आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणमधील सद्य:स्थितीबाबतही चर्चा केली. अफगाणप्रणीत शांतता प्रकिक्रयेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, तसेच अमेरिका-तालिबान शांतता समझोत्यात पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, असेही कुरेशी यांनी सांगितले. अफगाणमधील १८ वर्षांच्या रक्तरंजित युद्धानंतर अमेरिका व तालिबानने २९ फेब्रुवारी रोजी समझोता केला आहे.
पाक रशियाशी करणार दीर्घकालीन भागीदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:27 AM