इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरत आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लष्करप्रमुख असताना पाकिस्तानमधील सरकार उलथवून लष्करी राजवट लागू करणारे पंतप्रधान म्हणून परवेझ मुशर्रफ यांची जगभरात ओळख आहे. सन 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानवर राज्य केलं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, त्या अफवा असून मुशर्रफ यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.