शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Imran Khan Arrested, BREAKING: मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 3:10 PM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

Imran Khan Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) वकील फैसल चौधरी यांनी माजी पंतप्रधानांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान रेंजर्सनी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेरून अटक केली. इम्रान खान यांना 'अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात' अटक करण्यात आली आहे. पीटीआयचे नेते इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. इम्रानच्या अटकेनंतर पीटीआयने निषेधाची घोषणा केली आहे.

----

इम्रान खानच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादचे महानिरीक्षक (IG) म्हणाले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे. IG यांनी सांगितले की कलम 144 लागू करण्यात आली आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याचवेळी, पीटीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान झालेल्या हाणामारीत इम्रानचे वकील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले इम्रान यांच्या पक्षाचे नेते?

पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयात हल्ला झाला आहे. इम्रान खानला अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक म्हणजे न्यायालयीन यंत्रणा बंद पाडण्यासारखे आहे. उच्च न्यायालयाला रेंजर्सनी घेराव घातला असून वकिलांचा छळ होत आहे, असे फवाद चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या कारला देखील चारही बाजूंनी घेरण्यात आले होते.

पीटीआय नेते अझहर मशवानी यांनी आरोप केला की, इम्रान यांचे न्यायालयाबाहेर रेंजर्सनी 'अपहरण' केले. ते म्हणाले की, पक्षाने तत्काळ प्रभावाने देशभरात निदर्शने सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, इम्रान खान यांचा छळ केला जात आहे. रेंजर्सने इम्रान खान यांना मारहाण केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात...

दरम्यान, जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शरीफ म्हणाले की राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थेला नियमितपणे बदनाम करणे आणि धमकावणे हे खानचे पाऊल अत्यंत निषेधार्ह आहे. जनरल फैसल नसीर आणि आमच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही आणि ते खपवून घेतले जाणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

माजी राष्ट्रपती झरदारींची इम्रान खान यांच्यावर टीका

माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले की, पीटीआय प्रमुखांनी संस्थांना बदनाम करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. झरदारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "संस्थांना बदनाम करण्याच्या प्रयत्नामुळे माणसाचा खरा चेहरा समोर आला आहे आणि तेवढे पुरेसे आहे. त्यांचे भाषण ऐकून कोणीही देशभक्त परदेशी एजंटच्या मागे जाण्याचा विचारही करू शकत नाही. झरदारी म्हणाले की, पाकिस्तानी लष्करातील धाडसी आणि प्रतिष्ठित अधिकाऱ्यांवरील आरोप म्हणजे संपूर्ण पाकिस्तान ज्या संस्थेच्या पाठीशी उभा आहे, त्या संस्थेवरचा हल्ला आहे. एक माणूस आपल्या निष्पाप कार्यकर्त्यांना खोटे आणि कपटाने मूर्ख बनवत होता, त्याचे पतन मी पाहत आहे. आम्ही एका व्यक्तीला आमच्या मूल्यांशी आणि देशाशी खेळू देणार नाही."

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानArrestअटक