इस्लामाबाद: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घरवापसीमागचं सत्य सांगून पाकिस्तान सरकारची पोलखोल करणारे खासदार अयाज सादिक यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. सादिक यांनी केलेल्या विधानांमुळे इम्रान खान सरकारच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे आता इम्रान खान सरकार हात धुवून सादिक यांच्या पाठीमागे लागलं आहे. पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष असलेल्या सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी इम्रान खान सरकारनं सुरू केली आहे.अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीतीसादिक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं खान यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या शिबली फराज यांनी सांगितलं. यानंतर शनिवारी पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज शाह यांनी सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचे संकेत दिले. 'सादिक यांच्याविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. सादिक यांच्याविरोधात संविधानाच्या कलम-६ अंतर्गत खटला चालवण्याची मागणी यातून करण्यात आली आहे,' असं शाह म्हणाले. पाकिस्तानच्या संविधानातील कलम-६ देशद्रोहाशी संबंधित आहे.आश्चर्य! लाहोरच्या रस्त्यांवर लागले अभिनंदन आणि मोदींचे पोस्टरकाय म्हणाले होते अयाज सादिक? भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी म्हटलं.
पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या अयाज सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याची तयारी सुरू
By कुणाल गवाणकर | Published: November 01, 2020 9:51 AM