इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून जाळपोळ व हिंसक निदर्शने केली. त्यांनी पेशावरमधील रेडिओ पाकिस्तानची इमारत, लाहोरमध्ये आर्मी कमांडरचे घर गव्हर्नर हाऊसला आग लावली. पाकिस्तानमधील १८ शहरांमध्ये हिंसाचाराचे लोण पसरले आहे.
विदेशी राजदूतावासांतील कर्मचाऱ्यांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये,
अशा सूचना पाकिस्तान सरकारने दिल्या आहेत.
इस्लामाबाद येथील पोलिस लाईन्स मुख्यालयातील नव्या गेस्ट हाऊसचे न्यायालयात रूपांतर करण्यात आले आहे.
डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका
पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांच्या समर्थकांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकीकडे हे बदमाश त्यांचे “मर्यादित आणि स्वार्थी उद्दिष्टे” साध्य करण्यासाठी देशाच्या भावना भडकावतात आणि दुसरीकडे लोकांची फसवणूक करतात. हे ढोंगीपणाचे उदाहरण असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
अटकेशी काहीही देणेघेणे नाही - लष्कर
इम्रान खान यांच्या अटकेशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही, अशी भूमिका पाकिस्तानी लष्कराने मांडली आहे. त्यांना झालेल्या अटकेशी लष्कराचा काहीही संबंध नाही. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पीटीआयचे काही नेते पाकिस्तानात राजकीय हेतूने हिंसाचार घडवत आहेत. या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा पाकिस्तानी लष्कराने दिला आहे.
मनी लाँड्रिंग : शाहबाज शरीफ व त्यांचा पुत्र निर्दोष
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व त्यांचा मुलगा हमजा हे दोघे मनी लाँड्रिंग च्या एका प्रकरणात निर्दोष असल्याचे नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्यूरोने म्हटले आहे. या प्रकरणी २०२० साली शरीफ पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट खात्यांद्वारे बेकायदेशीरपणे पैसे वळते केल्याच्या या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण झाली आहे.