Pakistan Fawad Chaudhary, Imran Khan Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी मंत्री फवाद चौधरी यांच्याबाबतीत एक अजब किस्सा घडला. सुटकेनंतर काही वेळातच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फवाद चौधरी यांनी अटक टाळण्यासाठी कारमधून उडी मारली आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयात परत पळाले व लपून बसले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर , ते परत येण्यासाठी त्यांच्या कारमध्ये बसले होते, तेव्हा त्यांना दहशतवाद विरोधी पथक आपल्या दिशेने येताना दिसले. पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच ते आपल्या कारमधून उतरले आणि उच्च न्यायालयाच्या आवारात धावत जाऊन लपले. यात आश्चर्याची बाब म्हणजे हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतरही पोलिसांनी फवाद यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पाहा Video:
वास्तविक फवादने त्याच्या जामीनादरम्यान हायकोर्टात म्हटले आहे की आपण कलम 144 चे उल्लंघन केले नाही आणि आपण निदर्शनात सहभागी झालो नाही. तत्पूर्वी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पीटीआय नेते फवाद, शिरीन मजारी आणि सिनेटर फलक नाझ यांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या अधिनियम 3 अंतर्गत बेकायदेशीर घोषित केले.
वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मियाँ गुल हसन औरंगजेब यांच्या कोर्टाने पीटीआय नेत्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. फवाद चौधरी यांच्या सुनावणीदरम्यान बॅरिस्टर जहांगीर जादून त्यांच्या वतीने खंडपीठासमोर हजर झाले.
काही तथ्ये न्यायालयासमोर मांडण्याची परवानगी त्यांनी मागितली. यादरम्यान त्यांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाची प्रत आयजी कार्यालय किंवा कायदा अधिकाऱ्यांनाही देण्यात आलेली नाही. याचिकेवर पीटीआय नेत्याची बायोमेट्रिक पडताळणीही झालेली नाही, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, या युक्तिवादावर न्यायाधीशांनी वकिलाला फटकारले आणि बायोमेट्रिक झाली की नाही हे पाहणे न्यायाधीशांचे काम आहे, असे सांगितले.