इस्लामाबाद : कोरोना संकटाच्या काळात जगातील सर्वच देशांचे प्रमुख कोरनावर कशापद्धतीने मात करतायेईल, यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावत आहेत. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र, आपला पूर्ण वेळ भारताविरोधात गरळ ओकण्यातच खर्च करत आहेत. आता त्यांनी नेपाळ आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारची नाझीवादाशी तुलना -इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे, की हिदुत्ववादी मोदी सरकारची अभिमानी विस्तारवादाची भूमिका नाझी विचार धारेप्रमाणे आहे. भारत आपल्या शेजाऱ्यांसाठी धोका बनत चालला आहे. तो नागरिकता कायद्याच्या माध्यमाने बांगलादेश, नेपाळ-चीनसोबत सीमा वाद आणि पाकिस्तानला खोट्या लष्करी कारवाईच्या माध्यमाने धमक्या देत आहे.
युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
दुसऱ्या एका ट्विटमध्ये इम्रान म्हणाले, जम्मू-काश्मीरवर अवैध कब्जा, चौथ्या जेनेव्हा कन्व्हेंशअंतर्गत युद्ध अपराध आणि तो पाकिस्तान अधिकृत काश्मीरवर दावा करत आहे. फॅसिस्ट मोदी सरकार भारतातील अल्पसंख्यकांना केवळ दुय्यम नागरिकत्वच देत नाही, तर क्षेत्रीय शांततेसाठीही धोक्याचे आहे. यापूर्वीही इम्रान यांनी काश्मीर मुद्यावरून अनेक वेळा भारताविरोधात गरळ ओकली आहे.
भारताविरोधात यापूर्वीही इम्रान यांनी गरळ ओकली आहे - इम्रान यांचे भारतावर टीका करणे नवे नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा भारतावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्विट करत, काश्मीरसंदर्भातील मोदींची भूमीका ही आरएसएस प्रेरित असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर कश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत मोदी सरकार क्रुरपणे वाग आहे. असा आरोपही इम्रान यांनी केला होता.