पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खान यांना पाकिस्तान पोलीस अटक करणार असल्याची माहिती समोर आली आहे, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने इम्रान खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्याच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यात सुरक्षा जामीन मागितला होता, इस्लामाबादमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने याच प्रकरणात त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर पीटीआय प्रमुखाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तोशाखान्याचा निकाल ईसीपीने जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीटीआय नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. 3 नोव्हेंबर रोजी एका रॅलीदरम्यान वजिराबाद येथे झालेल्या हत्येच्या प्रयत्नात जखमी झाल्यानंतर खान वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर आला होता.
देवानेच तारले... दहा दिवसांनंतर १७ वर्षीय युवतीची जिवंत सुटका
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान इम्रान खानच्या वकिलाने सांगितले की, त्यांचा अशिला काही मिनिटांत न्यायालयात हजर होईल कारण तो मार्गात आहे. त्यावर खंडपीठ म्हणाले, इम्रान खान यांनी निर्धारित वेळेत हजर व्हायला हवे होते. याचिकाकर्ते किंवा त्यांचे वरिष्ठ वकील न्यायालयात हजर झाले नाहीत, त्यामुळे याचिका फेटाळण्यात येत आहे, असे म्हणत न्यायमूर्तींनी याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती तारिक सलीम शेख यांनी याचिका फेटाळल्यानंतर इम्रान खानच्या वकिलाला पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष यांना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रांतीय पोलीस प्रमुखांना इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमसोबत बसून सुरक्षा व्यवस्था अंतिम करण्याचे आदेश दिले.