Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडलाय. आयएमएफने अजुनही कर्ज दिलेले नाही. श्रीलंकेला काही दिवसापूर्वी कर्ज दिले आहे, पण पाकिस्तानला पुन्हा काही अटी घातल्या आहेत. यामुळे पाकिस्तानच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत. आता महागाईने मोठ्या प्रमाणात वाढली असून केळी ५०० रुपयांवर तर द्राक्षे १६०० रुपये किलोवर पोहोचले आहेत, यामुळे पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य जनतेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तान सरकारविरोधात देशात नाराजी सुरू आहे, तर सरकार आयएमएफकडून कर्जासाठी प्रयत्न करत आहे. रोजच्या लागणाऱ्या वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कांद्याचे दर २२८.२८ टक्क्यांनी वाढलेत. पिठाच्या किमती १२०.६६ टक्क्यांनी वाढल्या. इंधनाच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक अडचणीवरुन सरकारवर टीका केली. यावेळी खान यांनी पाकिस्तानला वाचवण्यासाठी १० कलमी ब्लू प्रिंट सादर केली. 'परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परदेशी पाकिस्तानींना पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि मदतीसाठी वारंवार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संपर्क साधायची गरज नाही. 'जे लोक वस्तू निर्यात करतात आणि डॉलर देशात आणतात त्यांना आम्ही मदत करू, असंही इम्रान खान म्हणाले.
गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला IMF कडून कर्ज मिळालेले नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पाकिस्तान आणि IMF यांच्यात १.१ अब्ज डॉलरचे कर्ज देण्याबाबत चर्चा सुरू आहे.