ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 30 - पाकिस्तानचे माहिती मंत्री परवेझ रशीद यांना मंत्रिमंडळातून शनिवारी रात्री उशिरा डच्चू देण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी दिलेल्या माहितीमुळे सैन्य व शासनात तणाव निर्माण झाला होता. दहशतवाद्यांना गोपनीय पद्धतीने पाकिस्तानी सैन्य मदत करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने ६ ऑक्टोबरच्या अंकात ही माहिती प्रसिद्ध केली होती. यामुळे दहशतवाद संदर्भात आयोजित सभेत शासन व सैन्य अधिकार्यात खडाजंगीही उडाली होती.