नवी दिल्ली - पाकिस्तानच्या सुरक्षा मत्रायलयाने गिलगिट-वाटटिस्थान सरकरला एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी भारतचा चीन-पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला जोरदार विरोध सुरू असून तो उध्वस्त करण्यासाठी योजना आखत असल्याचे स्पष्ट केलं आहे. चीन या प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करणार आहे. या आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला भारताचा विरोध असून त्यासाठी भारतानं आपली रणनीती तयार केली असल्याचा पाकिस्तानकडून दावा करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे स्थानिक वृत्तपत्र दी डॉनने पाकिस्तानच्या गृह विभागाच्या एका आधिकाऱ्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, भारत आर्थिक कॉरिडोर(CPEC)च्या विरोधात आहे. त्यामध्ये आडचणी आणण्यासाठी भारतानं आपल्या 400 मुस्लीम तरुणांना आफगानिस्तानमध्ये दहशथवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवले आहे. 28 जानेवारी रोजी पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयानं एक पत्र (लेटर नंबर-221/IS2018)लिहले आहे. त्यामध्ये असा दावा केला आहे की, भारतानं तरुणांना ट्रेनिंग घेण्यासाठी अफगाणिस्तानला पाठवलं आहे. या तरुणांमार्फत भारत आर्थिक कॉरिडोर(CPEC)वर दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन करत आहे.
गिलगिट, हुंजा, स्कर्दू आणि गिजरमध्ये कोराकोरम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, बलावरिस्तान नॅशनल स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, गिलगिट-बाल्टिस्थान युनायटेड मूव्हमेंट आणि बलावरिस्तान नॅशनल फ्रंटसारख्या विद्यार्थी आणि राजकीय संघटना CPECला विरोध करत आहेत. CPEC प्रोजेक्टच्या माध्यमातून गिलगिटवर अवैधरीत्या कब्जा केला जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. CPEC प्रोजेक्ट हा गिलगिट-बाल्टिस्तानच्या लाचारीचा रस्ता असल्याचं आंदोलक म्हणतायत. CPEC हा चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टचा एक भाग आहे. CPEC आणि OBORच्या माध्यमातून चीनचा गिलगिटच्या भूभागावर कब्जा करण्याचा इरादा आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत.
मतभेदांमुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचू नये यासाठी चीन सीपीईसी प्रकल्पावरुन जे मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे असे हुआ च्युनयिंग यांनी सांगितले. कोणा एकाला आपण समस्या सोडवायला सांगू शकत नाही. या मुद्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी भारताबरोबर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे असे च्युनयिंग म्हणाल्या आहेत.