ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 25 - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मेहम्मूद आसिफ यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका खोट्या वृत्तावर विश्वास ठेवत इस्रायलला युद्धाचं आव्हान दिलं आहे. त्यांनी इस्रायलला अप्रत्यक्षरीत्या अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देऊन टाकली आहे.
दरम्यान, इस्रायलनं इस्लामाबादला सीरिया हल्ल्यात हस्तक्षेप केल्यास आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली आहे, असं खोटं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर या वृत्ताची शहानिशा न करताच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना हे वृत्त खरं वाटल्यानं त्यांनी प्रत्युत्तरादाखल इस्रायलला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा मेहम्मूद आसिफ म्हणाले, पाकिस्तान हा आण्विक शस्त्रास्त्रांनी सज्ज देश आहे. याची जगाला आठवण करून द्यावी लागते आहे. संरक्षण मंत्र्यांनी इशा-यातच इस्रायलला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. मात्र द टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, इस्रायलनं सार्वजनिकरीत्या कधीच कुठल्याही देशाला आण्विक हल्ल्याची धमकी दिली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि इस्रायलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.
Israeli def min threatens nuclear retaliation presuming pak role in Syria against Daesh.Israel forgets Pakistan is a Nuclear state too AH— Khawaja M. Asif (@KhawajaMAsif) 23 December 2016