शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:15 IST

Pakistan, Missing CM found, Ali Amin Gandapur: पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरु असताना खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला होता.

Pakistan, Missing CM found: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय तणावाचे वातावरण आहे. गेल्या एक वर्षापासून तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. याचदरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर हे बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला होता. ते बेपत्ता झाल्याचे पक्षाचे म्हणणे होते. तशातच बेपत्ता असलेल्या खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर ( Ali Amin Gandapur ) विधानसभेत हजर झाले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या तेहरीक-ए-इन्साफच्या निदर्शनादरम्यान त्यांना अटक झाल्याचे म्हटले जात होते पण त्यांनी मात्र अटकेचे वृत्त नाकारले. संपूर्ण वेळ मी खैबर पख्तूनख्वा हाऊसमध्ये उपस्थित होतो असे ते म्हणाले.

सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते शनिवारी बेपत्ता झाला होते आणि त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. आता ते रविवारी स्वत:हून पुढे आले आणि खैबर पख्तूनख्वा हाऊसवर छापा टाकल्याबद्दल आणि कर्मचारी व महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल इस्लामाबादचे आयजीपी नासिर अली रिझवी यांच्यासह अधिकाऱ्यांना फटकारले.

पोलीस महानिरिक्षकांविरुद्ध तक्रार

इस्लामाबादच्या IG विरुद्ध FIR नोंदवण्याची घोषणा करताना त्यांनी सभागृहात माफी मागावी लागेल, असे गंडापूर यांनी सांगितले. रावळपिंडीच्या तुरुंगात एका वर्षाहून अधिक काळ बंदिस्त असलेल्या इम्रान खानच्या पक्षाने न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी अनेक आंदोलने केली. यात आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, पीटीआय पक्षाने सीएम अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्यानंतरही इम्रान खानच्या सुटकेच्या समर्थनार्थ आंदोलन सुरूच ठेवले होते. पक्षाने रात्री बैठक घेतली. जोपर्यंत इम्रान खान हे निदर्शने संपवण्याचा आदेश देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानChief Ministerमुख्यमंत्रीMissingबेपत्ता होणंImran Khanइम्रान खान