पाकिस्तानात चांद नवाबनंतर, आता आणखी एक पत्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या महिला पत्रकाराने लाइव्ह रिपोर्टिंग दराम्यान एक मुलगा कॅमेऱ्यासमोर आल्याने त्याच्या कानाखाली लगावली आहे. या महिला पत्रकाराचा व्हिडिओ पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्स तो शेअरही करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात ईद उल अजहानिमित्त एक महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असताना हा प्रकार घडला. यावेळी तिच्याभोवती मोठी गर्दीही जमलेली दिसत आहे आणि संबंधित मुलगाही तिच्या अगदी डाव्या बाजूलाच उभा असलेला दिसत आहे.
अद्याप पाकिस्तानातील या महिला पत्रकाराची ओळख होऊ शकलेली नाही. मात्र, या व्हिडिओमध्ये, संबंधित महिला पत्रकार आपला पीस टू कॅमेरा संपताच, एका मुलाच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महिला रिपोर्टरने मुलाला थापड का मारली, असा सवाल काही लोक करताना दिसत आहेत, तर काही युजर्सनी लिहिले आहे, मुलगा काही चुकीचे बोलला असेल, यामुळे रिपोर्टरला राग आला असेल आणि तिने मुलाला थापड मारली असेल.
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही युजर्सना तर, हा प्रकार नेमका का घडला, हे समजू शकले नाही. तर काहींनी संबंधित महिलेच्या अशा कृत्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, बहुतांश लोक रिपोर्टच्या बाजूनेच दिसून आले.