सिंध: पाकिस्तानातल्या सिंध विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आपापसात भिडले. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली. तहरीक-ए-इन्साफच्या नेत्यांनी एकमेकांची खाली पाडून धुलाई केली. सिनेट निवडणुकीवरून हा प्रकार घडला. या फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिनेट निवडणुकीत आपण आपल्या मर्जीनुसार मतदान करणार असल्याची घोषणा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) तीन आमदारांनी केली होती. अस्लम आबरो, शहरयार शार आणि करिम बख्श गबोल अशी या आमदारांची नावं आहेत. पीटीआयच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका घेतल्यानं पक्षातले इतर नेते या तीन आमदारांवर संतापले. हे तीन आमदार सभागृहात येताच इतर नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
VIDEO: पाकिस्तानातल्या विधानसभेत तुफान राडा; इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:05 IST