शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमेरिका प्रवेशबंदीच्या यादीत आता पाकिस्तान ?

By admin | Published: January 30, 2017 7:35 AM

अमेरिकेत मुस्लिम बहुल देशांतील लोकांना बंदी घालण्याच्या यादीत आगामी काळात पाकिस्तानचेही नाव समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेत मुस्लिम बहुल देशांतील लोकांना बंदी घालण्याच्या यादीत आगामी काळात पाकिस्तानचेही नाव समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे, असे संकेत व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिका-याने दिले आहेत. कट्टरतावादी मुस्लिम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या सात देशांतील लोकांना अमेरिकेमध्ये सध्या नो एन्ट्री लागू करण्यात आली आहे. 
(ट्रम्प यांच्या मुस्लिम बंदी आदेशाविरुद्ध निदर्शने)
 
व्हाईट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी रियन्स प्रीबस यांनी सांगितले की,'अमेरिका प्रवेशबंदी करण्यात आलेल्या 7 देशांमध्ये घातक, धोकादायक दहशतवाद निर्माण होत असल्याचे काँग्रेस आणि तत्कालीन ओबामा प्रशासनाच्या निदर्शनास आले. याच कारणामुळे या देशांतील लोकांना अमेरिका प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला'. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. 
 
प्रीबस यांनी असेही सांगितले की, 'ज्या अन्य काही देशांमध्ये अशाच प्रकारच्या समस्या आहेत, त्या देशांविरोधातही ट्रम्प इशारा करण्याची शक्यता आहे. सध्याचे पाऊल तात्काळ असून या देशांत जाणारे आणि येणा-या लोकांची कसून तपासणी केली जाईल'.  
 
(ही मुस्लिमांवरील बंदी नाही - ट्रम्प यांचा खुलासा)
 
दरम्यान, सात मुस्लिम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत नागरीक निदर्शने करत आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. सर्वच त्यांच्यावर टीका होत असली तरी हा निर्णय योग्य असून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले.
 
तसेच ही सरसकट सर्व मुस्लिमांवरील बंदी नसून त्यातून कट्टरतावादी मुस्लीम व दहशतवाद्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. याशिवाय लॉबिंग बंदी, इस्लामिक स्टेटचा पराभव करण्याची योजना तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला बलशाली करण्याची योजना यांच्यावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.
 
या व्यूहरचनेमुळे अमेरिका इसिसविरोधात निर्णायक पाऊल उचलू शकेल. अमेरिका तोंड देत आहे तो मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद एवढाच इसिसचा धोका नाही तर ती खूपच विषारी आणि आक्रमक संघटना आहे. ती स्वत:चे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनेत चर्चेला, वाटाघाटींना जागा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.