शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
4
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
9
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
14
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
15
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
16
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
17
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
18
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

पाकिस्तान सैरभैर, भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, उच्चायुक्तांनाही परत बोलावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 7:55 PM

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती.

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननेभारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. याचाच अर्थ पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तांना भारतात परत पाठविणार आणि नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तांना पाकिस्तानमध्ये परत बोलवणार आहे. यानुसार, भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत जाण्यास पाकिस्तानने सांगितले आहे. 

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. याशिवाय, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाईल. याशिवाय, 5 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस 'काळा दिवस' म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द झाल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सहन झालेले नाही. केंद्र सरकारने या राज्याचा विशेष दर्जा रद्द करत विभाजनही केले आहे. यामुळे धक्का बसलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. यावेळी इम्रान खान यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केला आहे. 

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी त्यांची जीभ घसरली. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. तर, इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे.'

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Indiaभारत