शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

Pakistan Elections : पाकिस्तानात ऑगस्टमध्ये होऊ शकतात सार्वत्रिक निवडणुका; इम्रान खान, शरीफ यांच्यात एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 7:36 PM

पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका घेण्याचे आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. परंतु सरकारनं त्यांना निधी देण्यास नकार दिला.

इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफनं (PTI) सरकारी टीमसोबत तिसऱ्या फेरीच्या चर्चेदरम्यान निवडणुका ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचं मान्य केलं आहे. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तानच्यानिवडणूक आयोगाला (ECP) पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका घेण्याचे आदेश दिले होतं, असं वृत्त समा टीव्हीनं दिलं आहे. मात्र, सरकारनं त्यांना निधी देण्यास नकार दिला.

सत्ताधारी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) आणि विरोधी पीटीआयच्या चर्चा करणाऱ्या टीम सार्वत्रिक निवडणुका वेळेवर घेण्यात येणाऱ्या चर्चेत गुंतले आहेत. आता दोन्ही बाजून सामंजस्यानं पुढे जात आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते शाह मेहमूद कुरेशी, फवाद चौधरी आणि सिनेटर अली जफर यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीटीआय शिष्टमंडळानं सरकारी टीमशीही चर्चा केली.

भूमिका मवाळसरकारी टीममध्ये माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, अर्थमंत्री इशाक दार, कायदा मंत्री आझम नझीर तरार, रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक, वाणिज्य मंत्री नावेद कमर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्री तारिक बशीर चीमा आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तानचे (एमक्युएम-पी) प्रतिनिधी किश्वर जहरा यांचा समावेश आहे. पीटीआयच्या टीमनं आठ कलमी शिफारशीचा मसुदा पीडीएम टीमला सुपूर्द केला. हा मसुदा आपल्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात पाठवणार आहे.

समा टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षानं अर्थसंकल्पानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुका घेण्यावर सहमती दर्शवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. चर्चेच्या फेरीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री डार यांनी पुष्टी केली की सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनीही त्यांची भूमिका थोडी मवाळ केली आहे. दोन्ही टीम आपापल्या पक्ष नेतृत्वाला अहवाल देतील. दरम्यान, दार म्हणाले की, देशभरात एकाच दिवशी निवडणुका घेण्यासाठी परस्पर सहमतीनं तारीख ठरवण्यात आलेली नाही. देशभरात एकाच दिवशी निवडणुका झाल्या पाहिजेत, असा पुनरुच्चार मंत्र्यांनी केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूकImran Khanइम्रान खान