इस्लामाबाद- पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी नासिर उल मुल्क यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश होते आता पंतप्रधानपदाची त्यांच्याकडे अंतरिम जबाबदारी असेल.25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत.नासिर उल मुल्क यांच्या नेमणुकीवर कोणताही पाकिस्तानी माणूस बोट दाखवू शकत नाही असं अब्बासी यांनी त्यांच्या नेमणुकीबद्दल बोलताना सांगितले. यावेळेस त्यांच्याशेजारी विरोधीपक्षनेते सय्यद खुर्शिद अहमद शाह होते. अब्बासी यांची पाकिस्तान मुस्लीम लिग नवाज आणि शाह यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये या विषयावरुन बराच तणाव होता.गुरुवारी पाकिस्तानची संसद बरखास्त होणार आहे. मुल्क यांनी यापुर्वी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगाचे प्रमुखपद सांभाळले आहे.अंतरिम सरकारकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.
पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 3:50 PM