पाकिस्तानी नौदलाने नुकतीच आपली एक पाणबुडी चिनी नौदलाच्या युद्धनौकाबरोबर कराचीत तैनात केली होती. उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानने चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी अगोस्टा-19 बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी तैनात केली होती. फ्रेंच बनावटीची ही पाणबुडी बाबर-3 आण्विक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. पाकिस्तान आणि चिनी नौदलांच्या या युतीमुळे भारताची चिंता देखील वाढू शकते.'या' पाणबुड्यांचा पाकिस्तान आणि मलेशियन नौदलात समावेशयापूर्वी असा दावा केला जात होता की, चिनी युद्धनौकासह त्याची पाणबुडीही पाकिस्तानच्या कराची बंदरावर पोहोचली होती. आता चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी पाकिस्तानने आपली पाणबुडी तैनात केल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. अगोस्टा-19 बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी फक्त पाकिस्तान आणि मलेशियाकडून आशिया खंडात चालविली जाते.पाकिस्तान चीनकडून 8 पाणबुड्या खरेदी करणारफोर्ब्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी नौदल आपली ताकद वाढविण्यासाठी चिनी डिझाइनवर आधारित टाइप 039 बी युआन क्लास पाणबुडी खरेदी करीत आहे. ही डिझेल इलेक्ट्रिक चिनी पाणबुडी पाकिस्तानच्या नौदलाची शक्ती वाढविण्यास सक्षम आहे. ज्यात अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन सिस्टीममुळे ही पाणबुडी कमी आवाज निर्माण करते. ज्यामुळे पाण्याखाली तिला शोधणे फार कठीण आहे.अगोस्टा-19 बी प्रकारच्या पाणबुड्या आण्विक हल्ला करण्यास सक्षमफ्रान्समध्ये बनविलेल्या पाच अगोस्टा-19 बी प्रकारच्या पाणबुड्या पाकिस्तानकडे आहेत. त्यापैकी तीनचे एअर इंडिपेंडेंट पॉवरमध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या शस्त्रागारात या पाणबुड्या सर्वात शक्तिशाली आणि आधुनिक आहेत. या पाणबुड्या आधुनिक लढाऊ प्रणाली आणि एएस -39 एक्झोसेट अँटी-शिप क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. याव्यतिरिक्त, या वर्गाच्या पाणबुड्या बाबर -3 आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यास सक्षम आहेत.
चिनी नौदलासोबत दिसली पाकची घातक अण्वस्त्रसज्ज पाणबुडी, भारताला घेरण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 8:10 PM