इस्लामाबाद : सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) सर्वेसर्वा नवाज शरीफ लवकरच लंडनहून परततील, अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने सर्व शक्ती पणाला लावूनही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिओ न्यूजने सनाउल्ला यांचा हवाला देत म्हटले आहे की नवाज शरीफ लवकरच परत येतील आणि पीएमएल-एनच्या निवडणूक मोहिमेची देखरेख करतील. नवाज (७३) हे नोव्हेंबर २०१९ पासून वैद्यकीय उपचारांसाठी लंडनमध्ये राहत आहेत.