इस्लामाबाद: चीनला आपला मित्र समजणारा पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालेला आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानवर आयएमएफनं दिलेल्या कर्जाहून चीनकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा दुप्पट आहे. पाकिस्तान हा चीनच्या कर्जात आकंठ डुबलेला असून, कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या कर्जामुळे पाकिस्तानसमोर परकीय चलनाचंही मोठ संकट उभं राहिलं आहे.आयएमएफनुसार, पाकिस्तानला जून 2022पर्यंत चीनकडून घेतलेलं 6.7 अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, आयएमएफनं 2022मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित एक बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहेत. तसेच पाकिस्तानला इतर कर्जांसाठी 2.8 अब्ज डॉलरची गरज आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्ताननं कर्जाच्या संकटातून उभारी घेण्यासाठी चीनकडूनच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आहे. चीनकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या कर्जामुळे पाकिस्तान वेगळ्याच संकटात सापडला आहे. कराचीतल्या ऑप्टिमस कॅपिटल मॅनेजमेंट हाफिज फैजान अहमद म्हणाले, बेल्ट अँड रोड प्रोजेक्टची सुरुवात केल्यानंतरच पाकिस्तानच्या कर्जाच्या रकमेत वाढ झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी चीनकडून घेतलेल्या कर्जात वारंवार वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान आणखी कर्जे घेत सुटला आहे. त्यामुळे तो दिवसेंदिवस कर्जाच्या फेऱ्यात अडकतो आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानचा बेल्ट अँड रोड प्रोजेक्टमुळे संकटात सापडलेल्या देशांमध्ये सामील करण्यात आलेलं होतं. सेंटर फॉर स्टडी ऑफ पाकिस्तानच्या मेंबर बुरजिन वाघमर म्हणाले, आता चीनकडून घेतलेलं कर्ज हे पाकिस्तानच्या गळ्यात अडकलेला काटा ठरतो आहे.
पाकिस्तानवर IMFहून चीनचं अधिक कर्ज, बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 9:01 AM