Pakistan on Jammu-Kashmir : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 79 व्या अधिवेशनाला संबोधित केले. शरीफ यांनी आपल्या भाषणात गाझा येथील इस्रायली हल्ल्यावर जोरदार टीका केली. यासोबतच, त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाबत गरळ ओकली. भारत काश्मिरींचे हक्क हिरावून घेत आहे. सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काढून घेतलेला काश्मीरचा विशेष दर्जा परत करावा, असे शरीफ म्हणाले.
काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे भारतकलम 370 हटवण्यासारखे पाऊल उचलू शकत नाही. भारत काश्मीरची संरचणा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात बाहेरुन लोकांना आणून वसवले जात आहे. हे थांबले पाहिजे, आम्ही याचा निषेध करतो. भारताने कलम 370 लागू करावे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.
बुरहान वानीला काश्मिरी विसरले नाहीतयावेळी शरीफ यांनी दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख केला. ते म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन करत आहे. सरकारची दडपशाही असूनही काश्मीरमधील जनता बुरहान वानीला विसरलेली नाही. बुरहानची विचारधारा काश्मीरींच्या मनात कायम आहे. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
भारत आक्रमकता दाखवतोय, त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारताने कोणतीही आक्रमकता दाखवल्यास पाकिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. भारताने पाकिस्तानच्या सकारात्मक प्रस्तावांना प्रतिसाद दिला नाही, जे निराशाजनक आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.