Pakistan defence budget: आपल्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याऐवजी पाकिस्तानने एक असा निर्णय घेतलाय, ज्याने संपूर्ण जग चकीत झालंय. आधीच प्रचंड आर्थिक संकट आणि कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानच्या नवीन शाहबाज सरकारने संरक्षण बजेट वाढवण्याची घोषणा केली आहे.
पाक सैन्य 1400 अब्जातून अधिक मजबूत होईल?शाहबाज शरीफ सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी लष्कर आणि इतर सशस्त्र दलांना पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 1,400 अब्ज रुपये ($7.6 अब्ज) पेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. नुकतीच करण्यात आलेली दरवाढ चालू वर्षाच्या संरक्षण बजेटपेक्षा सुमारे 83 अब्ज रुपये अधिक असेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सहसा, अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या वेळी, सर्वांच्या नजरा संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूदीकडे असतात.
एका सैनिकावर वर्षाला 26.5 लाख खर्च 'द डॉन' वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सशस्त्र दलांसाठी 1,453 अब्ज रुपयांचे वाटप गेल्या वर्षीच्या 1,370 अब्ज रुपयांच्या वाटपाच्या तुलनेत सुमारे 83 अब्ज रुपये अधिक असेल. यात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संरक्षण अर्थसंकल्पातील ही वाढ मुख्यत्वे कर्मचार्यांशी संबंधित खर्च, पगार आणि भत्त्यांवर खर्च केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानमधील प्रत्येक जवानावर होणारा वार्षिक खर्च 26.5 लाख रुपये आहे, जो भारताच्या खर्चाच्या एक तृतीयांश भागही नाही.
अर्थव्यवस्थेची काळजी करू नकाआकडेवारीनुसार, पुढील आर्थिक वर्षात पाकिस्तानचे संरक्षण बजेट एकूण खर्चाच्या 16 टक्के असेल. सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाटा पाहता, तो चालू वर्षात 2.54 टक्क्यांवरून 2.2 टक्क्यांवर येईल. दरम्यान, इस्लामाबादच्या प्रत्येक नापाक कृत्याला आणि हालचालींना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातील तालिबानी सैनिकांचे कडवे आव्हानही त्यांच्या सैनिकांना आहे. अशा स्थितीत गळ्यापर्यंत कर्जबाजारी होऊनही पाकिस्तान संरक्षण बजेट वाढवून स्वत:च्या भल्याची स्वप्ने पाहत आहे.