नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरच्या (POK) उत्तरेकडील भागात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये लोक मागील काही दिवसांपासून पाकिस्तानविरोधात निदर्शने करत आहेत. हा भाग भारतानं केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये घ्यावा अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. महागाई, बरोजगारीनं त्रस्त जनतेने पाकिस्तान सरकारविरोधात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी भारतात सामावून घ्यावं अशी मागणी करत लोक रस्त्यावर उतरली आहेत.
गेल्या अनेक दशकापासून पाकिस्तान सरकारकडून आम्हाला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याचसोबत आमच्या भागावर अन्याय सुरू आहेत. सोशल मीडियावर या निदर्शनाचे अनेक व्हिडिओ समोर आलेत ज्यात गिलगिट बाल्टिस्तानचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील सकरदू कारगिल रोड पुन्हा सुरू करावा. लडाखमध्ये जे बाल्टिस्तानचे लोक आहेत त्यांच्यासोबत आम्हाला राहू द्यावं अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. या भागात लोकांनी स्वातंत्र्यापासून हिरावलं जात आहे. महागाईमुळे गहू आणि सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकत नाही. त्यासाठी सरकारने सब्सिडी द्यावी अशी मागणी आंदोलन करणाऱ्या लोकांनी केली आहे.
पाकिस्तानी लष्कर गिलगिट-बाल्टिस्तानमधील गरीब भागातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा दावा करत आहे. जीबीमध्ये पाकिस्तान सरकार आणि लोकांमधील जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून आहे, परंतु २०१५ पासून हा वाद आणखी वाढला आहे. हा भाग पीओकेमध्ये असल्याने जमीन त्यांच्या मालकीची आहे असा स्थानिकांचा असा युक्तिवाद आहे. त्याच वेळी, प्रशासनाचे म्हणणे आहे की जी जमीन कोणालाही दिली गेली नाही, ती पाकिस्तान सरकारची आहे.
पाकिस्तानचे आर्थिक संकट आणि लोकांचा निषेधपाकची संपूर्ण जनता सध्या दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहे. देशात गहू, डाळी, साखर आदींचा मोठा तुटवडा असून, त्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानातील सरकार या भागातील लोकांशी भेदभावपूर्ण वागणूक देत आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयची या भागात सत्ता आहे, त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकार जाणीवपूर्वक वस्तूंचा पुरवठा करू देत नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.