कराची - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं असून यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले असल्याची माहिती मिळत आहे. पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे.
एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते. त्यानंतर आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.
अपघाताच्या बरोबर 10 मिनिटे आधीच पायलटचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. कराची एअरपोर्टवर लँडिंगपूर्वी पायलट म्हणाला, 2 राउंड घेतल्यानंतर लँडिंग करू. मात्र यानंतर विमानाला अपघात झाला. अपघातापूर्वी पायलटने लँडिंग गिअर ओपन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते ओपन होऊ शकले नाही. पाकिस्तानातील एका वृत्तानुसार, पायलटची लँडिंग करण्याची इच्छा होती. मात्र, व्हिल ओपन हेत नव्हते. त्यामुळे त्याला काही वेळ विमान वरच उडवत राहावे, असे सांगण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान ते क्रॅश झाले.
पाकिस्तानचे अध्यक्ष अरीफ अल्वी, पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. लष्करप्रमुख बाजवा यांनी लष्कराला मदत आणि बचाव कार्यासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...
कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल