इस्लामाबाद - कधीकाळी 'प्लेबॉय' प्रतिमेसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान बलात्कारासाठी महिलांचे कमी कपडेच जबाब आहेत, असे वक्तव्य करून चांगलेच अडकले आहेत. यामुळे, खुद्द पाकिस्तानी लोकच सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या या असल्या विचारसरणीवर निशाणा साधताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर, आता इमरान खान यांचे अगदी कमी कपड्यांवरील महिलांसोबत चुंबन घेत असल्याची आणि पार्टी करत असल्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Pakistan playboy PM Imran Khan came into rape controversy kissing pictures with women viral)
बलात्कार टाळण्यासाठी महिलांना बुरखा घालण्याचा सल्ला देणाऱ्या इमरान खान यांनी आता केवळ आपल्या वक्तव्याचा बचावच केला नाही, तर महिलांच्या कमी कपडे घातलण्याचा परिणाम पुरुषांवर होतो, असेही म्हटले आहे. एका मुलाखतीदरम्यान, बलात्काराचा संबंध अश्लिलतेशी जोडून केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, ते म्हणाले, 'हे निर्थक आहे, मी तसे कधीच म्हटले नही. मी म्हटले होते, की बरुखा व्यवस्था समाजात आकर्षित होण्यापासून वाचविण्यासाठी आहे.'
'महिलांच्या कमी कपडे परिधान केल्याचा परिणाम पुरुषांवर होतो' -इमरान म्हणाले, पाकिस्तानी समाज आणि पाकिस्तानची जीवनशैली अगदी वेगळी होती. ते म्हणाले, आपण जर समाजातील आकर्षण वाढविले आणि या सर्व तरुण मुलांकडे कोठेही जाण्याची जागा नसेल, तर त्याचे परिणाम उद्भवतात. यावर त्यांना विचारण्यात आले, की आपल्याला वाटते, ज्या महिला परिधान करतात, त्याचा आकर्षणावर परिणाम होतो? यावर इमरान म्हणाले, 'जर एखादी महिला खूपच कमी कपडे परिधान करत असेल, तर त्याचा पुरुषांवर परिणाम होईल. हे कॉमन सेन्स आहे.
इमरान खान यांच्या या विधानाने आता सोशल मीडियामध्ये खळबळ उडाली आहे. प्रख्यात पाकिस्तानी महिला पत्रकार घरिदा फारूकी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'लज्जास्पद'. आश्चर्यचकित, खूप संतप्त आहे. या विधानाचा मी तीव्र निषेध करते. नव्हे, पंतप्रधान खान साहेब, बलात्कार, हिंसाचार आणि हल्ले करणाऱ्या पुरुषांना भडकवण्यासाठी महिलांचे कपडे जबाबदार नाहीत. कदापी नाही. हे पीडितेला आरोपी ठविणे आहे आणि पुरुषांना क्लीन चिट दिल्या सारखे आहे. बलात्कार पीडितांचा अपमान करू नका.
इमरान खान यांचे परदेशी महिलांसोबत चुंबन घेतानाचे फोटो व्हायरल -पंतप्रधान इमरान यांच्या वक्तव्याचा निषेध होत असतानाच, लोक त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फतह म्हणतात, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटा. जगभरातील महिलांसोबत असंख्यवेळा लैंगिक कृत्य करणारे इमरान खान सध्या आपल्या चौथ्या पत्नीसोबत आहेत. आपल्या देशातील महिलांना बलात्कारापासून वाचवण्यासाठी ते बुरख्याला प्रोत्साहन देत आहेत. एवढेच नाही तर, क्रिकेटपटू असताना इमरान यांच्या रंगेल आयुष्यातील फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये इमरान खान परदेशी महिलांबरोबर चुंबन घेताना दिसत आहेत. यात बर्याच महिलांनी अगदी कमी कपडे परिधान केले आहेत.