शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार?; पाकिस्तानात वेगवान घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:17 AM

लष्कर आणि खान यांच्यातील वाद टोकाला; लष्करानं खान यांना दिले दोन पर्याय

नवी दिल्ली/इस्लामाबाद: गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या प्रमुखपदावर करायच्या नियुक्तीवरून पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यात निर्माण झालेला वाद टोकाला गेला आहे. लष्करानं इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम २० नोव्हेंबरपासून आयएसआयचं डीजीपद सांभाळणार आहेत. त्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यामध्ये संघर्ष झाला. आयएसआयची धुरा लेफ्टनंद जनरल फैज हमीद यांच्याकडेच ठेवली जावी, असं बाजवा यांना वाटतं.

इम्रान खान यांच्यापुढे दोन पर्याय ठेवण्यात आल्याचं वृत्त सीएनएन-न्यूज१८ नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. इम्रान खान यांनी स्वत:चं २० नोव्हेंबरआधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा हा पहिला पर्याय देण्यात आलेला आहे. तर संसदेत विरोधक बदल करतील, असा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायांत खान यांची खुर्ची जाणं निश्चित आहे. येत्या काही आठवड्यांत सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफच्या अडचणी वाढतील, अशी माहितीदेखील सुत्रांनी दिली आहे. मुतहिदा कौमी मूव्हमेंट आणि पाकिस्‍तान मुस्लिम लीग हे दोन मित्रपक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफची साथ सोडतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

पीटीआयचे परवेज खटक आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असू शकतात. पाकिस्तान सरकारनं गेल्याच आठवड्यात तहरीक ए लब्बेक पाकिस्तानच्या शेकडो समर्थकांची सुटका केली आहे. हिंसक आंदोलनं संपुष्टात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा समूह पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलनं करत होता. एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेला तहरीक ए लब्बेक पाकिस्तानचा नेता साद रिझवीची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानISIआयएसआय