शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

US नं फक्त 'भाड्याच्या बंदुकी'सारखा वापर केला; अमेरिकेच्या 'त्या' वक्तव्यावर इम्रान खान म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 6:00 PM

पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता? तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत.

इस्लामाबाद - अमेरिकेची दहशतवादाविरोधी लढाई ही पाकिस्तानसाठी विनाशकारी ठरली. अफगाणिस्तानातील 20 वर्षांच्या उपस्थितीत वॉशिंग्टनने इस्लामाबादचा वापर केवळ  'भाड्याच्या बंदुकी'सारखाच केला. आम्ही भाड्याने घेतलेल्या बंदुकीसारखे होतो. आम्ही त्यांना (अमेरिका) अफगाणिस्तानातील युद्ध जिंकण्यास मदत करावी, अशी आशा केली जात होती, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. (Pakistan PM Imran khan said America used islamabad like a hired gun during their 20 year presence in Afghanistan)

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटी ब्लिंकन यांनी नुकतेच म्हटले आहे की, अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर, अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध आहेत. असेही म्हटले गेले आहे की, जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानात दहशतवाद विरोधात लढाई लढत होता, तेव्हा पाकिस्तान या दहशतवाद्यांना मदत करत होता. यासंदर्भात पुरावेही समोर आले आहेत.

अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

अमेरिकेने पाकिस्तानवर टीका केलेल्यानंतर, आता इम्रान खान यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत दहशतवाद्यांना मदत आणि सुरक्षा पुरविण्याचे आरोप फेटाळले आहेत. इम्रान खान म्हणाले, हे 'सेफ हेवेन्स' काय आहे? अमेरिकेचे ड्रोन सातत्याने पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेजवळ लक्ष ठेवून असतात. जर तेथे दहशतवाद्यांना सुरक्षा दिली गेली असती, तर त्यांना निश्चितपणे माहिती मिळाली असती.'

पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता? तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत. मात्र, एकिकडे असे भाष्य करत असतानाच, इम्रान खान आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानातील नव्या काळजीवाहू सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहनही करत आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका