पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा एकदा सामान्य ज्ञानावरून टीका होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं वक्तव्य केलं. एवढंच नाही, तर आकडेवारीबाबत बोलताना त्यांना नीटही बोलता आलं नाही. यापूर्वीही त्यांच्या सामान्य ज्ञानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांनी तेहरानमध्ये जापान आणि जर्मनी आपले शेजारी देश असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी चीन हा पाकिस्तानचा शेजारी देश असल्याबाबतही नकार दिला होता.
इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप असल्याचंही म्हटलं. त्यापैकी एक म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि दुसरा म्हणजे वनडे क्रिकेट असंही ते म्हणाले, यानंतर जून महिन्यात झालेल्या आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पिअनशीबाबत न्यूझीलंडची वाहवा करताना न्यूझीलंडची लोकसंख्या चाळीस पन्नास लाख, तर भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं सांगत त्यांनी भारताला टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये पराभूत केल्याचं म्हटलं.