पाकिस्तानमध्ये (Pakistan) सायबर क्राइमची एक घटना समोर आली आहे. पंजाब प्रांतातील एका महिला आमदाराचा तिच्या कथित बॉयफ्रेन्डसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या महिला नेत्याचं नाव सानिया आशिक आहे. सानिया आशिक (Sania Ashiq) पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या सदस्य आहेत आणि पंजाब प्रांतातील तक्षशिला विधानसभा मदतार संघातील मेंबर ऑफ प्रोव्हेंशिअल आहेत.
सानिया आशिक यांनी २६ ऑक्टोबरला सरकार आणि केंद्रीय चौकशी समितीकडे या व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली होती. मोठ्या चौकशीनंतर पोलिसांनी हा व्हिडीओ लीक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. पण एजन्सीने याबाबत काहीच खुलासा केला नाही. सानिया नवाज शरीफची मुलगी मरियम नवाजची निकटवर्तीय मानली जाते. तसेच ती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टिका करत असते.
२६ ऑक्टोबरला सानिया आशिकने FIA कडे तक्रार दिली होती. त्यानंतर याची कॉपी सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केली होती. सानियाचा आरोप आहे की, सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दिसणारी महिला त्यांच्यासारखी दिसते. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, व्हिडीओत दिसणारी महिला सानिया आशिक आहे. सानिया आशिक यांनी याची तक्रार केंद्र सरकारकडेही केली.
साधारण तीन आठवड्यांच्या तपासानंतर FIA ने लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे पोलिसांनी त्याची ओळख जाहीर केली नाही. हेह सांगितलं नाही की, व्हिडीओत दिसणारी महिला सानिया आशिक आहे की नाही. फक्त एका व्यक्तीच्या अटकेची माहिती दिली.