नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना दुसऱ्या बाजुला पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे. अनेकदा भारताच्या नादी लागून हरलेल्या पाकिस्ताननेचीनच्या सैनिकांना भारतीय जवानांनी शिकविलेला धडा चांगलाच जिव्हारी लावून घेतला आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी करण्यास सुरुवात केली असून पाकव्याप्त काश्मीरमधील हॉस्पटलांचे 50 टक्के बेड आरक्षित केले आहेत.
गलवान घाटीमध्ये तणाव वाढल्यास त्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानी सीमेवर उमटू शकते, अशी भीती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना वाटू लागली आहे. यामुळे त्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो अशी भीती नुकतीच व्यक्त केली होती. तसेच गेल्या काही काळापासून गिलगिट, बाल्टिस्तानसह पीओके खाली करण्याची धमकी भारताने दिली आहे. यामुळे पाकिस्तानने युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. बाजवा यांनी पीओकेच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रामध्ये त्यांनी या भागातील सर्व हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड लष्करासाठी आरक्षित करावेत. तसेच रक्तपेढ्यांमधील 50 रक्तपिशव्याही लष्करासाठी राखीव ठेवाव्यात असे आदेश दिले आहेत. पीओकेचे आरोग्य मंत्री डॉ. मुहम्मद नजीब नकी खान यांना लष्करप्रमुख बाजवा यांनी पत्र लिहिले आहे. पाकिस्तानी सैन्यासाठी सर्व हॉस्पिटलचे 50 बेड राखीव ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सैन्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासू शकते. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक तेवढा साठा करून ठेवावा.
बाजवा यांचे पत्र अशावेळी आले आहे, जेव्हा भारताने चीनला गलवान घाटीमध्ये चांगलाच इंगा दाखविला आहे. चीन सीमेवनप युद्धसदृष्य स्थिती असून दोन्ही बाजुने सैन्याची जमवाजमव सुरु झाली आहे. एका सीमेवर तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तानकडूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे भारत पाकिस्तानवर देखील हल्ला करू शकतो अशी भीती बाजवांना वाटत आहे. गलवान घाटीमध्ये भारताने चीनला आक्रमकता दाखविली आहे, मग पीओकेसाठीही भारताकडून कडक पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. यामुळे हल्ला झालाच तर त्याला तोंड देता यावे यासाठी पाकिस्तानकडून तयारी सुरु झाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी
OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात
मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार
चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते
सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'
बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद