इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर कोरोनासंदर्भातीली सार्क देशांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत काश्मीरचा राग आळवणाऱ्या पाकिस्तानमध्येच आता कोरोना संकट 'आ' वासून उभे राहिले आहे. या संकटापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी मदतीची याचना करण्यासाठी चीनला पोहोचले आहेत.
पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 184 वर पोहोचली आहे. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात हा आकडा सर्वाधिक आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती इम्रान खान यांच्य दाव्यांपेक्षा पूर्ण पणे भिंन्न आहे. येथील सिंध प्रांत हा कोरोनाचा गड बनत चालला आहे. येथे सर्वाधिक 150 जमांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्तूनख्वामध्ये 15, बलुचिस्तानमध्ये 10, पंजाबमध्ये 2, राजधानी इस्लामाबादमध्ये 2, तर गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये कोरोचाचे 5 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात गेल्या 24 तासांत कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीनपट वाढली आहे. यातील तब्बल 115 रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आढळले आहेत.
कोरोनामुळे दोन डॉक्टकही संक्रमित -सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली यांनी जनतेला शांततेचे आव्हान केले आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या कराचीत कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात कोरोना ग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टरही सुरक्षित नाहीयेत. येथे दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
द नेशनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (पीआयएमएस) येथे बचावासाठी अत्यावश्यक साधनेही उपलब्ध नाहीत. यामुळे येथे डॉक्टरही सुरक्षित नाहीत. या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की येथील डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
चीनसमोर पाकिस्तानने पसरले हात -कोरानाचे संकट ओढवल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना चीनकडे मदतीसाठी पाठवले आहे. चीनवर कोरोनासंकट ओढवल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर गेले आहेत. एवढेच नाही, तर राष्ट्रपति अल्वी यांचाही हा पहिलाच चीन दौरा आहे.